मांगवलीत पाईपला लागलेली आग आटोक्यात

 

वैभववाडी न.पं. चा अग्निशमन बंब घटनास्थळी

वैभववाडी प्रतिनिधी
मांगवली येथे वनव्यामुळे पाईपांना लागलेली आग विझविण्यासाठी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत चा अग्निशमन बंब दाखल झाला. नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी काही तासांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र आगीत अरुणा प्रकल्पाचे जळून खाक झाले आहेत. धुराचा मोठा लोळ मांगवली परिसरात पसरला आहे. या आगीत पाईप जळाल्याने कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.
अज्ञाताने लावलेल्या आगीत ही घटना घडली. उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांनी तात्काळ नगरपंचायत प्रशासनाशी संपर्क साधला. कर्मचारी सचिन माईणकर, विजय चिंदरकर यांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.