महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे यांनी घेतले जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांचे आशीर्वाद

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी सौ. नीलमताई राणे यांच्या समवेत जावून नाणीज येथे जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

महायुतीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाने ना. राणे यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरवडे येथील त्यांच्या गावी जावून कुलदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी येथे प्रयाण केले. यावेळी नाणीज येथे सुंदरगडावर जगद्गुरू श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी सौ. नीलमताई राणे याही उपस्थित होत्या. श्री नरेंद्रचार्य महाराज यांनी राणे दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. तसेच त्यांना शुभाशीर्वाद दिले.