खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील वावेतर्फे नातू येथील रोहिदासवाडी येथील राहत्या घराच्या पाठीमागील लाकडी खोपटीत बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची चढ्या भावाने विक्री करत असताना पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रंगेहाथ पकडले.
नीलेश गणपत शिरकर असे संशयिताचे नाव असून त्याच्याकडून ३५०० रूपयांच्या ऐवजासह इतर साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.
या बाबत पोलीस महिला कॉन्स्टेबल शबाना मुल्ला यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










