वेंगुर्ला येथील स्पर्धेत एकाच लेखकाच्या दोन नाटकांना पहिला आणि दुसरा क्रमांक

 ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर लिखित ‘वडाची साल पिंपळाक’ आणि ‘कोर्टात खेचीन’ अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय

राजन लाड (जैतापूर )

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कालवी बंदर वेंगुर्ला येथे नुकतीच नाट्य स्पर्धा पार पडली या स्पर्धेत अनेक नाटकांचा सहभाग होता. या स्पर्धेत एकाच लेखकाच्या दोन नाटकांना पहिला आणि दुसरा क्रमांक प्राप्त झाला.

 

 

 

सुप्रसिद्ध वस्त्रहरणकार आणि जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या वडाची साल पिंपळाक आणि कोर्टात खेचीन या नाट्यकलाकृती ना प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाले. या स्पर्धेत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक कोर्टात खेचीन या नाटकाचे दिग्दर्शक शेखर गवस यांना तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस वडाची साल पिंपळाचे संदीप धुरी , अमित गावडे यांना प्राप्त झाले. या बक्षिसांबरोबरच या दोन्ही नाटकातील कलाकारांसह तंत्रज्ञाना देखील अनेक पारितोषिके प्राप्त झाली.

 

 

 

नेपथ्य प्रथम दादा हळदणकर( वडाची साल पिंपळाक) द्वितीय बाबा सुतार, दत्ताराम कुळ्ये (कोर्टात खेचीन) प्रकाश योजना द्वितीय क्रमांक श्रीकांत चेंदवणकर (वडाची साल पिंपळाक) तृतीय क्रमांक ऋषिकेश उर्फ दादा कोरडे (कोर्टात खेचीन) पार्श्व संगीत तृतीय क्रमांक वामन धुरी(वडाची साल पिंपळाक) सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम क्रमांक भूमिका (गोविंदा)शुभम जाधव (कोर्टात खेचीन) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांक भूमिका (लक्ष्मी)मनस्वी जाधव (कोर्टात खेचीन)