उ.भा.ठा गटाचे भाजपात इन्कमिंग सुरूच,सलग अकराव्या दिवशी एकापाठोपाठ एक धक्के
आमदार नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी भाजप पक्षामध्ये प्रवेश
कणकवली :कणकवली तालुक्यातील डांबरे गावातील उबाठा पक्षाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रघु जाधव यांच्यासह प्रदीप जाधव, सिद्धार्थ जाधव, अनिल जाधव, पांडूरंग जाधव, प्रमोद जाधव, गणपत जाधव, विलास जाधव,यांनी आज ओम गणेश निवासस्थानी येथे भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून कोणतेची विकास कामे होत नसल्याने आमदार नितेश राणे यांच्या कार्यावर प्रभावित होवून भाजप मध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून डांबरे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली गावचा विकास आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन रघु जाधव व कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला आहे.
उपस्थित मिलिंद मेस्त्री, माजी सरपंच बबलू सावंत, डांबरे सरपंच किरण कानडे, ग्रा.स. संतोष मेजरी, उपसरपंच सागर साटम, संदीप साटम, सुमित मेजारी, प्रथमेश दळवी, आदि भाजप उपस्थित होते..












