भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांचे कौतुक
सावंतवाडी :
लोकसभेच्या या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी रत्नागिरी पासून ते दोडामार्गपर्यंत मी अनेक ठिकाणी सभा व मेळावे घेत आहे. मात्र माडखोल येथील आजच्या मेळाव्यात येथील आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी आपल्या मंडलातून ८० टक्के मतदान देण्याचा दिलेला शब्द निश्चितच कौतुकास्पद आहे. या विश्वासाने जर सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम केले तर समोरील उमेदवाराचे डिपॉझिट नक्कीच जप्त होईल असा विश्वास लोकसभा निवडणुकीतील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त करीत रवींद्र मडगावकर यांच्या कार्याचे कौतुक केले.

माडखोल येथील महायुतीच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, सांगली सरपंच लवू भिंगारे, राजन राऊळ, प्राजक्ता केळुस्कर, किरण राऊळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











