चिपळूण, राजापूर येथे प्रचार बैठका, सभा तर रत्नागिरीत भाजपा नेते विनोद तावडे यांची उपस्थिती
रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री यांना नारायणराव राणे हे मंगळवार दि. 23 एप्रिलपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून विविध बैठकांचाही आयोजन या दरम्यान करण्यात आला आहे.
मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी ना. राणे हे चिपळूण दौऱ्यावर येत आहेत. यामध्ये संध्याकाळी ४ वा. खेर्डी येथे कुंभार समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ५ वा. वारकरी समाजाची बैठक होईल. संध्याकाळी ६ वा. चिपळूण संगमेश्वर विधानसभा कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. तर ७ वा. दसपटी येथील रामवर्धिनी मंदिर कबड्डी स्पर्धेला ना. राणे भेट देणार आहेत.
बुधवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 9. 30 वा. ना. राणे यांच्यासह भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे विधानसभा बुद्धिजीवी व्यक्तीशी हितगुज आणि चर्चा करणार आहेत. सकाळी 11 वा. स्वयंवर मंगल कार्यालय येथे महायुतीच्या 300 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. संध्याकाळी ५ वा. चर्मकार समाज बैठक, त्यानंतर मुस्लिम समाज बैठक आणि त्यानंतर तेली समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे.
गुरुवारी 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. पावस, गोळप, नाचणे, हरचेरी आणि हातखंबा या जिल्हा परिषद गटांचा मेळावा फणसोप हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला आहे. तर वाटद, कोतवडे, करबुडे, शिरगाव आणि मिरजोळे या गटांचा मेळावा संध्याकाळी ५ वा. खंडाळा येथे आयोजित करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता आडिवरे येथे महायुतीच्या समन्वय बैठकीला ना. राणे उपस्थित राहतील तर संध्याकाळी ५वा. पाचल येथे महायुतीच्या समन्वय बैठकीला ना. राणे उपस्थित राहणार आहेत.












