रेडी येथील उबाठा सेना पदाधिकारी नमिता बागायतदार यांचा सहकऱ्यांसमवेत भाजप मध्ये प्रवेश
वेंगुर्ले : दाजी नाईक
ही लोकसभेची निवडणूक खूप महत्वाची आहे. प्रचारासाठी विरोधक येतील आणि भुलवतील पण आपण आपल बहुमोल मत एऱ्यागैऱ्याला द्यायच की विकासाला द्यायच हे तुम्ही ठरवा. गेली ३४ वर्ष केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब या सिंधुदूर्ग जिल्ह्यासह कोकणात विविध माध्यमातून विकासात्मक कामे करत आहेत. यावेळी महायुती च्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राणे साहेबांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी कमळ या निशाणी समोरील बटन दाबून राणे साहेबांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन निलमताई राणे यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुक प्रचारार्थ आज वेंगुर्ले तालुक्यात निलमताई राणे यांनी झंझावती दौरा केला. चार ठिकाणी महायुती महिला मेळाव्यात उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला.
खासदारकीच्या माध्यमातून सेवा करण्याची पुन्हा एक संधी द्या..
सौ. निलमताई राणे यांनी परुळेबाजार येथील महायुती महीला मेळाव्यात मार्गदर्शन करताना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मतदान करून खासदारकीच्या माध्यमातून सेवा करण्याची पुन्हा एक संधी द्या असे आवाहन केले. यावेळी भाजपा महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी सभापती सौ. अस्मिता बांदेकर, भाजप महिला प्रदेश सदस्य सौ.संध्या तेरसे, माजी जि.प अध्यक्षा सुमेधा पाताडे, अँड सूषमा खानोलकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सौ. प्रज्ञा परब, भाजपा तालुकाध्यक्ष सौ. सुजाता पडवळ, माजी सभापती सौ. वंदना किनळेकर, माजी सभापती सौ. सारीका काळसेकर, बाजार समिती सदस्य सौ. सुजाता देसाई
माजी पं. स सदस्य सौ. गौरवी मडवळ, माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, श्वेता चव्हाण, माजी. प. स सदस्य सौ. प्रणाली बंगे, ग्रामपंचायत सदस्य सीमा सावंत, दिपा दाभोलकर यांसह मोठया संखोने महीलावर्ग उपस्थित होते. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर, प्रकाश राणे गुरुनाथ मडवळ यांसह पदाधिका-यांनी सौ. राणे यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित श्वेता कोरगांवकर, सुमेधा पाताडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन माजी सभापती वंदना किनळेकर व आभार दिपा दाभोलकर यांनी मानले.
रेडी येथील उबाठा सेना पदाधिकारी नमिता बागायतदार यांचा सहकऱ्यांसमवेत भाजप मध्ये प्रवेश
रेडी जि.प.मतदार संघाचा मेळावा रेडकर हॉस्पिटल सभागृह, रेडी येथे संपन्न झाला. या मेळाव्यात रेडी येथील उबाठा सेना पदाधिकारी नमिता बागायतदार यांनी सहकऱ्यांसमवेत निलमताई राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. या मेळाव्याला मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांनी केले. यावेळी प्रथम आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांनी या मतदारसंघातून नारायण राणे यांना मतदान करणे का गरजेचे आहे याची माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक नीता कविटकर यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी धडाडीचे नेतृत्व नारायणराव राणे यांना च मतदान करा असे आवाहन केले. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर , माजी अध्यक्ष अस्मिता बांदेकर, सुमेदा पतडे, शिवसेना महिला तालुका संघटक प्राची नाईक, उपजिल्हा प्रमुख उत्कर्षा गावकर, सुजाता देसाई, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, प्राची कुबल, उपजिल्हा संघटक आसावरी, रश्मी पेडणेकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, आरवली सरपंच समिर कांबळी, रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आभार उपसरपंच नमिता नागोळकर यांनी मानले.
गेल्या दहा दिवसातील सर्वात मोठा महिला मेळावा
वेंगुर्ले शहर, आडेली जि.प, उभादांडा जि.प. चा मेळावा स्वामिनी मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे झाला. या मेळाव्याला महिलांची मोठी उपस्थिती होती. ते पाहून नीलम ताई राणे यांनी गेल्या दहा दिवसातील मेळाव्यामध्ये वेंगुर्ले येथील हा सर्वात मोठा महिला मेळावा आहे असे सांगून महिलांचे आभार मानले. महिलांनी राणे यांच्या पाठीशी असेच उभे राहून त्यांना या भागाची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन नीलम ताई यांनी केले.

या महिला मेळाव्याला उपरोक्त महिला पदाधिकाऱ्यांसमवेत महिला जिल्हा उपाध्यक्ष ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, माजी सभापती स्मिता दामले, सारिका काळसेकर, शिवसेना महिला पदाधिकारी, भाजप महिला शहराध्यक्ष श्रेया मयेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर, हेमा गावस्कर, पुनम जाधव, मोठे सरपंच रूपाली नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, आणसूर उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते.
वेंगुर्ले येथे ताईंचे आगमन होताच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप जिल्हाउपाध्यक्ष बाळू देसाई, सत्यविजय गावडे, प्रणव वायंगणकर, सुहास गवंडकर, दादा केळुस्कर, साईप्रसाद नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केल.












