गझल गायन व लेखन मार्गदर्शक कार्यशाळा १८ रोजी 

गझल नवाज भीमराव पांचाळे,ज्येष्ठ गझलकार देविदास पाटील करणार मार्गदर्शन

गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली चे आयोजन

कणकवली :कारवा आहे गझलचा जायचे आहे पुढे

हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे…

मराठी गझलच्या प्रचार – प्रसाराचे कार्य करणाऱ्या गझल सागर प्रतिष्ठान , मुंबई आणि अखंड लोकमंच कणकवली यांचे संयुक्त विद्यमाने गझल लेखन व गझल गायन मार्गदर्शक कार्यशाळा नगर वाचनालय , कणकवली येथे शनिवार दिनांक १८ मे , २०२४ रोजी सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत आयोजित करण्यात आलेली आहे.

 

गझल नवाज भीमराव पांचाळे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करतील.

गझल लेखनाच्या आकृतीबंधाबद्दल प्राथमिक स्वरूपाचे धडे देण्यात येतील .

ज्येष्ठ गझलकार श्री देविदास पाटील , रत्नागिरी हे देखील कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून हजर राहतील.

 

गझलची वैशिष्ठ्यपूर्ण आशय प्रधान गायकी सोदाहरण , प्रत्यक्ष गायकीतून *भीमराव पांचाळे* उलगडून दाखवतील.

 

कणकवली आणि परिसरातील गझल लेखन आणि गायनामध्ये रुची असणाऱ्या इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि कार्यशाळेत सहभागी व्हावे.

 

सकाळचा नाश्ता , दुपारचे भोजन आणि सायंकाळच्या चहा बिस्किटाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येईल.

कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क ₹ २०० केवळ आकारण्यात येईल.

 

सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे

 शैलजा कदम-8805292596 , तसेच विनायक सापळे-9404940217 यांचेकडे नोंदवावित असे आवाहन आयोजकांतर्फे नामानंद मोडक (अध्यक्ष- अखंड लोकमंच सिंधुदुर्ग ) यांच्या वतीने करण्यात येत आहे.