खेड(प्रतिनिधी)
येथील पोलिसानी खेड शहरातील तीन बत्ती नाका व लोटे येथील एक्सल कंपनी नजीक शुभ अंकावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या दोन वेगवेगळ्या ठिकानी टाकलेल्या धाडीत दोघांकडून रोकड जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही ही कारवाया २४ एप्रिल रोजी करण्यात आल्या.
तीन बत्ती नाका, हुनमान मंदीराच्या समोरील गल्लीमध्ये महेंद्र विठ्ठल जाधव (वय – ६२ वर्षे,रा. शिरळ ता.चिपळूण) हा दैनिक पेपरमध्ये प्रसिध्द होणा-या शुभ अंकावर पैसे लावुन मटका- जुगाराचा खेळ खेळवित असताना रंगेहाथ मिळुन त्याच्या कडून १ हजार १४० रोकड जप्त करण्यात आली.
दरम्यान लोटे एम.आय.डी.सी येथील एक्सल कंपनीचे समोरील पाठीमागील मोकळ्या जागेत संदीप मधुकर जाधव (वय ४० वर्षे रा. खेंड कागणेवाडी ता.चिपळुण) हा देखील उभा राहुन मेन मुंबई नावाचे अंकावर स्वतः चे फायद्याकरीता लोकांकडून पैसे स्विकारुन मेन मुंबई नावाचा मटका जुगार खेळ खेळत असताना मिळून आला त्याच्या कडून १ हजार ७६३ रु रोकड जप्त करण्यात आली.












