पेंडूर ठाकरे गट युवासेना विभाग प्रमुख प्रज्वल प्रभू व सहकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

अमित खोत | मालवण: भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत कट्टा येथे भाजप युवामोर्चा पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी पेंडूर ठाकरे गट युवासेना विभाग प्रमुख प्रज्वल प्रभू यांनी सहकारी यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी प्रवेशकर्ते सर्वांचे भाजप पक्षात स्वागत केले.

प्रवेशकर्ते प्रज्वल प्रभू यांसह, मनोज परब, मंदार परब, विवेक नाईक, अक्षय कळसेकर, आबा कळसेकर, राजा नाईक, अनिकेत माडये, विशाल कोरगावकर, संचित ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केला अशी माहिती भाजप युवामोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे यांनी दिली.