
राजापूर (वार्ताहर): शतकोत्तर यशस्वी वाटचाल करणाऱ्या येथील राजापूर अर्बन को-ऑप. बँकेचे संचालक ॲड. शशिकांत सुतार यांना देश पातळीवरील व्यावसायिक नेतृत्व करणारी सिआरईएसटी इन्फोमेडिया पुणे या संस्थेचा आठवा ऑल इंडिया अर्बन बँक को. ऑपरेटिव्ह बॅकिंग अवॉर्ड २०२४ चा यांना ‘बेस्ट डायरेक्टर ऑफ इयर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार पुणे येथे दि. ८ मे २०२४ रोजी हॉटेल वेस्टन, कोरेगाव पार्क येथे प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिंना त्यांच्या नैपुण्यतेचा आणि अभ्यासू कार्यपध्दतीचा विचार करण्यात आल्याने त्यांना गौरविण्यात येणार आहे. ॲड. शशिकांत सुतार हे गेली आठ वर्षांपासून राजापूर अर्बन बँकेचे संचालक पद भुषवित असून बँकेला यशस्वी उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी मोलाचे योगदान व नेतृत्व करीत आहेत. त्यांनी बँकेच्या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन पद भुषविले आहे.
श्री. सुतार यांना यापूर्वी विविध संस्थांनी गौरविले असून या जाहीर झालेल्या आणखी एका पुरस्काराने त्यांचे सर्व स्तरातून व बँकींग क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे. बँकेसाठी सदर पुरस्कार हा अभिमानास्पद आणि भुषणावह आहे. या पुरस्कारांबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी वृंद यांचेकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे पुढील वाटचाल आणि सदैव यशस्वीततेसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
ॲड. सुतार यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने त्यांचा बँकेच्या वतीने बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विवेक गादीकर यांसह सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांसह कर्मचारी वृंद उपस्थीत होता.











