पेडणे (प्रतिनिधी) : गोव्यातील आघाडीचे पत्रकार निवृत्ती शिरोडकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अपघाता नंतर वेळीच झालेले उपचार व मेजर ऑपरेशनमुळे प्रकृत्ती सुधारत आहे.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे कला मंत्री गोविंद गावडे, आमदार जीत आरोलकर, आमदार प्रवीण आर्लेकर, जिल्हा सदस्य, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पत्रकार, संपादक यांच्यासह अनेक मान्यवरांनी बांबोळी हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.
आपल्या नवऱ्याला या हॉस्पिटलमध्ये उत्कृष्ट सेवा डॉक्टर देत असल्याचा विश्वास त्यांच्या पत्नी सौ. सुचिता शिरोडकर यांनी व्यक्त केला.











