ना. नारायण राणेंच्या प्रचारासाठी केसरकर ‘ऑन फिल्ड ‘

 

सावंतवाडी शहरात व्यापाऱ्यांची भेट घेत प्रचार : उस्फुर्त प्रतिसाद 

सावंतवाडी । प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ‘ऑन फिल्ड’ उतरले आहेत. सावंतवाडी शहरातील व्यापारी वर्गाची भेट नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन मंत्री केसरकर यांनी केलं. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि रासप पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला त्यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाल्या होत्या.

 

स्वतः शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ऑन फिल्ड’ उतरत शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेतली. यावेळी नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन मंत्री केसरकर यांनी केल.

 

ना. केसरकर यांनी भर उन्हात झंझावाती प्रचार करीत व्यापारी बांधवांशी संवाद साधला. रत्नागिरी सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारसंघात सावंतवाडी मतदारसंघ हा नारायण राणेंना सर्वाधिक लीड देणारा मतदारसंघ ठरेल व त्यात सावंतवाडी शहरातून सर्वाधिक मतदान मताधिक्य मिळेल, असा विश्वास यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला.

 

याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, शिवसेना शहरप्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुधन्वा आरेकर, संजय पेडणेकर, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, किर्ती बोंद्रे, परिक्षीत मांजरेकर, प्रतिक बांदेकर, बंटी पुरोहित, देव्या सुर्याजी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, संदीप निवळे, वर्धन पोकळे, अर्चित पोकळे, सुरज मठकर, माधुरी वाडकर, नंदू शिरोडकर, प्रथमेश कुडतरकर, सुनील नाईक, महेश सुकी, शुभांगी सुकी, दत्ता सावंत, सुकन्या टोपले, देवेन पडते, क्षीप्रा सावंत आदींसह मोठ्या संख्येने महिला तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.