कणकवली : 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पोदार इंटरनॅशनल स्कूल कणकवली येथे अत्यंत उत्साही व आनंददायी वातावरणात ध्वजारोहण करत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या प्राचार्या श्रीमती राणी मारिया झेवियर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत तसेच राज्य गीत देखील सादर करण्यात आले.
कार्यक्रमावेळी शाळेच्या प्राचार्या श्रीमती राणी मारिया झेवियर यांनी ध्वजवंदना देत सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख अतिथीसोबत शाळेचे अँडमिन ऑफिसर श्री. अक्षय पेंढारी,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका वेदिका परब, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.












