भाजपा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी राजिवडावासियाशी साधला संवाद
रत्नागिरी | प्रतिनिधी
देशातील प्रत्येक नागरिकाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सज्ज असतात,
देशवासीयांसाठी आरोग्य, शिक्षण, निवास, रोजगार उपलब्ध करून देताना त्यांनी कोणताही जातीभेद पाहिला नाही परंतु कोरोना काळात तुम्हाला वाऱ्यावर सोडणारे विरोधक मुद्दामहून हा जातीयवादाचा मुद्दा उगाळत आहेत, या मोदिनी सुरु केलेल्या देशाच्या विकास प्रक्रियेत आपण सगळेच सहभागी होताना तुमचे संरक्षक बंधारा, हक्काची घरे, जेटी आणि रस्त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी राजिवडा येथील त्यांच्या प्रचार सभेत केले.

राजिवडा येथे शुक्रवारी झालेल्या या प्रचार सभेला मुस्लीम समाजातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या आठवणीना उजाळा देताना ना. राणे म्हणाले मी बंदर विकास मंत्री असताना येथील मांडवी किनार्यावरील संरक्षक बंधारा मंजूर केला होता, त्याचे काम आता पूर्ण झाले आहे. याही पलीकडे तुमच्या काही मागण्या आहेत त्या येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल बिजली खान यांनी माझ्यकडे मांडल्या आहेत, त्यामध्ये समुद्रकिनाऱ्याच्या सुरक्षा बंधाऱ्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे, महामार्गावरून राजीवाड्याकडे येणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण कारणे, राजिवडा येथे जेटी बांधणे आहेत आणि पन्नास वर्ष जुनी झोपडपट्टी नियमित करणे. या तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन असे यावेळी ना. राणे म्हणाले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यानाही हा देश विकसित व्हावा, येथील प्रत्येक नागरिकांना चांगले जीवनमान मिळावे यासाठी ते नेहमीच प्रयत्शील असतात. कोरोना सारख्या महामारीमध्ये संपूर्ण जग कोलमडून गेले असतान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला सावरले, लसीकरण करून या रोगापासून देशाला त्यांनी मुक्त तर केलेच परंतु बंद झालेले कारखाने, बेरोजगारीतून त्यांनी लोकांना बाहेर काढण्यासाठी महत्वाची पावले उचलली, जनतेची या काळात उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य दिले, राहण्यास घरे, पिण्यास पाणी, आरोग्य यासाठी विशेष योजना आखल्या, मात्र हे करताना त्यांनी कधीच जात पात पाहिली नाही पण ज्यांच्याकडे करण्यासाठी काहीही नाही ते विरोधक मात्र मोदींवर टीका करत केवळ जातीयवाद वाढवत आहेत, गैरसमज पसरवत आहेत.

ना. राणे म्हणाले मोदींनी आणलेल्या पी एम विश्वकर्मा योजनेमध्ये मच्छीमारांसाठी प्रशिक्षण, कर्ज, अनुदान उपलब्ध आहे. मच्छिमारांच्या समस्यांची मला चांगली जाणं आहे, त्यांच्यासाठी काम केल्याचा माझ्याकडे अनुभव आहे, तुमच्या समस्यांचा मी अभ्यास केला आहे, त्या नक्की सोडवता येतील, त्याचसोबत आपण इथली परिस्थिती बदलूया, इकडच्या तरुण-तरुणींना चांगला रोजगार उपलब्ध करून देऊया असेही राणे म्हणाले.
विरोधक फक्त राणेंवर टीका करतात पण आम्ही सिंधुदुर्गात केलेल्या विकासकामांबद्दल ते बोलत नाहीत, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा अनेक प्रश्न सोडवताना मी कधीच जात बघितली नाही, माझ्यासाठी माणुसकी हीच जात आहे, मी तसाच वागलो आहे, पण कोणाच्या तरी सांगण्यावरून विनाकारण आपण गैरसमज करून घेतो, माझे मुस्लिम समाजातील अनेक लोकांशी चांगले हितसंबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये माझ्यासाठी माणूस हाच महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये जात-पात मी कधीच बघितली नाही, तुमचे जीवन दर्जेदार व्हावे, तुमच्या समस्या सुताव्या असे मला वाटते म्हणूनच ज्यांनी या देशाला प्रगतीची वाट दाखवली आहे त्या मोदींवर विश्वास ठेवून आपल्या उत्तम जीवनमानासाठी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी तुम्ही योगदान करावे असे आवाहन करतो असे ना. राणे म्हणले.
यावेळी व्यासपीठावर लोकसभा प्रभारी माजी आमदार बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शहराध्यक्ष राजन फाळके, दादा ढेकणे शोहेब खान, मुन्ना चवंडे, अमित विलणकर, अशोक वाडेकर उपस्थित होते. यावेळी बाळ माने म्हणाले मुस्लीम समाज हा भाजपा पासून लांब आहे असे विरोधक मुद्दाम पसरवत आहेत परंतु गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच प्रत्येक भारतीयासाठी काम केले आहे, जात पात पहिली नाही तर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव असल्याने ते तुमचे अनेक प्रश्न सोडवतील असा विश्वास आहे असेही बाळ माने म्हणाले.








