संतोष राऊळ (कणकवली)
हि निवडणूक कोकणच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आपल्या भूमीचा आणि सुपुत्राचा स्वाभिमान राखा. कोकणी बाणा दाखवून द्या. उबाठाचे उध्दव ठाकरे येथे येवून वाईट बोलत असतील तर त्याची परतफेड मत पेटीत भाजपच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबा आणि नारायण राणे यांना विजयी करा असे आवाहन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
मंत्री दीपक केसरकर म्हणले,यापूर्वी भारत देश गरीब देश म्हणून ओळखला जायचा मात्र गेल्या दहा वर्षात मोदी प्रधानमंत्री झाल्या पासून ओळख बदलली.आता पाकिस्तान पासून अनेक देशांना मोदी सारखा पंतप्रधान हवा आहे.उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना काजू साठी काहीच निर्णय घेतला नाही.मी त्या समितीवर होतो.
यावेळी मंत्री दीपक केसरकर,मनसे नेते बाळ नांदगावकर, माजी केद्रीय मंत्री आनंद राव अडसूळ,नितीन सरदेसाई,आमदार नितेश राणे,मनसे आमदार राजू पाटील,आमदार म्हात्रे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,सेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,सरचिटणीस मनोज चव्हाण,शिरिष सावंत,अविनाश अभ्यंकर,दिलीप धोत्रे,काका कुडाळकर,संजय यादवराव ,मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,मनसे प्रदेश सरचिटणीस मनोज चव्हाण म्हणाले दादांनी सर्वात जास्त काम केले कोकणी माणसा साठी जेजे देता येईल ते दादांनी दिले. जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. दादांनी जे ४० वर्षे जे काम केले त्याची पोच पावती देण्याची ही वेळ आहे.
यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, लग्नाला जास्त गर्दी असते मात्र त्याही पेक्षा कमी गर्दी असलेली सभा झाली. त्याला उबाठा अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आम्हाला शिव्या शाप दिले.त्यांना चार जून नंतर उत्तर देणारच आणि परत फेड करणार. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी आंगावर आला त्याला शिंगावर घेणार.मात्र ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. भाजपच्या मतांवर आणि मोदी साहेबांच्या जीवावर हा दहा वर्षे निवडून गेला. मात्र दहा वर्षे काय केले ते सांगितले नाही.तुमचा खासदार दहा वर्षे सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असताना काय केले ते सांगा.
कोकणचा खरा विरोधक उध्दव ठाकरे आणि त्यांचा पेंग्विन पुत्र आहे.त्यांनी सत्ता असताना कोकणासाठी काहीच केले नाही. नाईट लाईफ च्या नावाखाली महिलांवर अत्याचार केले.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली.











