पाळयेत हत्ती कडून नुकसानी सुरूच!!

दोडामार्ग | सुहास देसाई
तालुक्यात हत्ती प्रश्न गाजत असून पाळये येथे हत्तींनी उपद्रव माजविला आहे. तेथील शेतकरी प्रथमेश वरक यांच्या सुपारी व केळी उध्वस्त केल्या आहेत. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. याकडे वण विभागाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. तिलारी परिसरातून शेतकरी हतबल झाले असून हेवाले केर, मोर्ले परिसरात वास्तव्यास असलेल्या हत्तींनी त्यांचा मोर्चा पाळये गावाकडे वळविला आहे. रविवारी पहाटे ४ वा.च्या सुमारास तीन हत्तींचा कळप प्रथमेश वरक यांच्या फळ बागायतीत घुसला. सुपारीची झाडे मोडून केळी उध्वस्त केल्या. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. वनविभागाने या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रथमेश वरक यांनी केली आहे. याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे