वाफोलीत तरुणाची गळफास घेत आत्महत्या

 

बांदा | प्रतिनिधी : वाफोली कुडेरानवाडी येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या परप्रांतियाने घराच्या पडवीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

 

महंमद इक्बाल मदार शेख (४६, मूळ रा गुलबर्गा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली. बांदा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.