राजापूर (वार्ताहर): येथील राजापूर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कोंडये तर्फ सौंदळ येथे पहिल्या शाखेचा शुभारंभ सोहळा गुरूवार दि. ९ मे २०२४ रोजी सकाळी १० वा. पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिता व्हनमाने यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खालील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी डॉ. सोपानराव शिंदे यांचे हस्ते उद्घाटन होणार असून यावेळी सहा. निबंधक अविनाश इंगळे, कोंडये तर्फ सौंदळ सरपंच मिनल तळवडेकर, उपसरपंच महेश कारेकर, पोलीस पाटील सौ. मानसी कोंडकर, अनंत शिवगण, राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत राहणार आहेत.
यावेळी सर्व सभासद, ग्रामस्थ, ठेवीदार यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन पतसंस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शितल पटेल व सर्व संचालक, सचिव सौ. प्रेरणा अमरे व कर्मचारी वृंदातर्फे करण्यात आले आहे.
महिलांनी पुढाकार घेवून महिलांसाठी सुरू केलेल्या पतसंस्थेने यशस्वी वाटचाल करताना आपली पहिली शाखा कोंडये सुरू केली आहे. डॉ. प्रसाद हर्डीकर क्लिनिक शेजारी, मुंबई-गोवा हायवे, कोंडये, येथे ही शाखा सुरू होत आहे.









