दोडामार्ग | प्रतिनिधी : दोडामार्ग-बाजारपेठेतील पांडुरंग कॅफे समोर शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भर रस्त्यात स्विफ्ट कार उभी करून ठेवल्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना अडथळा होत होता. यावेळी मागाहून येणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरील कारचा अंदाज न आल्याने व समोरून दुसरी दुचाकी आल्याने यावेळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वार प्रवीण लमाणी (४५) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला माजी नगराध्यक्ष संतोष नांनचे व सहकाऱ्यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेतून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डाँ.ऐवाले यांनी त्याच्यावर उपचार केले.यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष नांनचे,पत्रकार संजय पिळणकर,ओंकार पेडणेकर,शाणी पेडणेकर,बापू पेडणेकर,राजू बोर्डेकर आदींनी मदतकार्य केले.
Sindhudurg