देवगड जमसांडे नगरपंचायतीच्या इमारतीत जवळच कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड केल्याने आज भाजपाने नगरपंचायतीला थेट धडक दिली. नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी याप्रकरणी गप्प बसण्याची भूमिका घेतली मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी पुढील दोन दिवसात कचरा उचलला जाईल असे आश्वासन दिल्याने अखेर भाजपाने दोन दिवस वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे
देवगड जमसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठुकरुल माजी आमदार अजित गोगटे,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, दया पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर खवळे, तनवी चांदोस्कर, यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवकांनी नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांना धारेवर धरले
या परिसरात एवढी दुर्गंधी पसरली आहे की मास्क लावून उभे राहावे लागते कचरा टाकण्यास जागाच नसल्याने हा कचरा या ठिकाणी आणण्यात आला असे सांगण्यात आले आहे कचरा किती दिवसात हलवता याबाबत लेखी मागणी द्या अशी मागणी भाजपाने केली मात्र नगराध्यक्षांनी त्याला नकार दिला अखेर मुख्याधिकारी सुरज कांबळे यांनी दोन दिवसात कचरा हलवण्याचे आश्वासन दिल्याने भाजपाने दोन दिवसात कचरा न हलवल्यास पुढे आंदोलन सुरू ठेवू अशा शब्दात मत व्यक्त केले आहे











