कोळंबे येथील आंबा बागेतील रखवालदार वृध्दाचा आकस्मिक मृत्यू

dead

रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोळंबे येथील आंबा बागेत राखणदार म्हणून कामाला असलेल्या वृध्दाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शनिवार 11 मे रोजी पहाटे 2 वा.सुमारास उघडकीस आली.
अशोक कृष्णा साळवी (64,रा.कोळंबे कुंभारवाडी,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलाने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, अशोक साळवी हे सुधीर मुरकर यांनी कोळंबे येथील भगवान भितळे यांची कराराने घेतलेल्या बागेत राखणदार म्हणून काम करत होते.
10 मे रोजी सकाळी 7 वा ते बागेत राखण करण्यासाठी गेले होते. परंतू सायंकाळी 7 वाजले तरीही घरी परतले नव्हते. त्यामुळे साक्षीदार धनश्याम साळवी, योगेश साळवी, संदीप साळवी, सुधीर मुरकर व संशय शिंदे हे सर्वजण त्यांचा शोध घेण्यासाठी बागेत गेले होते. त्यावेळी त्यांना बागेतील पायवाटेवर अशोक साळवी हे बेशूध्द अवस्थेत मिळून आले. त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुगणालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी अशोक सावळी यांना तपासून मृत घोषित केले.