
रवळनाथ विद्यामंदिर मध्ये भरला २२ वर्षानी पुनः वर्ग.
ओटवणे(प्रतिनीधी) वर्गात नव्हती आपली एवढी एकमेकांची दोस्ती , पण आठवते आता यार वर्गात केलेली सगळी मस्ती.
वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी, कधी कधी एन्जॉयही केली वर्गातील मारामारी.
होतो शिक्षकांच्या डोक्याला ताप, कारण होतेच सगळे तसे कलाकार . पण आता प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार . आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळे, आपापल्या कामामध्ये गर्क असतो सगळे ,पण शाळेतील दोस्तीची गोष्टच होती वेगळी, याच साठी परत एकदा भेटूया ना यार.
अस म्हणत रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे एस . एस.सी. २००२ चा व्हॉट्सग्रुप काही वर्षांपूर्वी तयार झाला आणि “या चिमण्यांनो परत फिरारे” म्हणत हाक दिली आणि शाळेतून दुर उडून गेलेली पाखर अखेर पुनः एकदा या विद्येच्या मंदिरात एकत्र आली. कुणी गोव्यातून आल, कुणी कोल्हापूरहून, कुणी मुंबई हुन आल तर कुणी पुण्याहून आल. सुरुवातीला विद्येची देवता सरस्वतिचे पूजन आणि संस्थेचे संस्थापक कै.प्रा.काका दामले यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन पूजन करून स्नेहमेळाव्याला सुरुवात झाली.जी मुल मुली एकमेकाना समोर बघून लाजायचे ते आज जून्या आठवणीने आणि एकमेकांच्या साथीने एका मेकासोबत बोलण्यात आणि मौज मजेत जीवनाचा आनंद घेताना दिसले आपुलकीने एक मेकाविषयी जाणून घेताना दिसले.
आज जरी अनेक ठिकाणी स्नेह मेळावे होत असली तरी ओटवणे हायस्कूल मधील पाहिल्या तिन ते चार बॅच मधील आठवणी या खरंच वेगळ्याच आहेत.कारण नुकतीच तयार झाली होती शाळा. २००२ ही शाळेची तिसरी बॅच सर्व काही नविन .शाळा नविन ,शाळेला शिक्षक नवीन,शिक्षकांना शाळा नवीन सर्वच नवं नवं.यात शाळेचे सुरुवातीचे कसोटीचे दिवस अनेक आव्हान पेलणारे शिक्षक वर्ग , कर्मचारी आणि त्यांच्या मागे पहाडासारखे उभे असणारे संस्थापक काका दामले आणि संस्था.आणि या सर्व प्रवासाचे साक्षीदार हे विद्यार्थी. या बॅच च्या मुलांनी अनुभवत आयुष्याच गणित, जीवनाचा संघर्ष इथच शिकला. काका दामले नी शाळेसाठी केलेलं रक्ताच पाणी आणि त्याग मुलांनी पाहिला.त्यामुळेच मुल एकत्र येत त्या भावविश्वात आठवणीत रममाण झाली.
कधीच समोर येवून न बोलणारे सुद्धा आज व्यक्त झाले.आज सर्वच मुलांनी पाहिलेला सरांचा संघर्ष , त्या वेळी स्वतः केलेला संघर्ष आज कामी आला असल्याचे बोलत गणित च्या आपल्या रावुळ सरांनी गणिताची शिकवलेली गणित समीकरण आज आयुष्याच गणित सोडविताना कामी आली अशा भावना व्यक्त करताना या शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसाई सर तर मुलांची आयुष्य जगण्याची प्रेरणा ज्या वेळी संकट यायची त्यावेळी देसाई सर आठवतात आणि संकट आपोआप कुठच्या कुठं निघून जातात.काही जणांनी तर आपणाला मृत्यूच्याही दाडेतून बाहेर काढले ते देसाई सरांच्या विचारांनी असे म्हणत हा स्नेह मेळावा एका भावूकतेच्या वेगळ्या उंचीवर नेला . सावंत मॅडम म्हणजे आपल्या हिंदी विषयाचा पाया भक्कम करणारे उत्तम कारागिर ज्यांच्यामुळे आमच्या सारख्या दगडालाही मूर्तीचा आकार आला असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.या आपल्या जडणघडणीत सर्वच सरांच मोठ योगदान आहे धोंगडे सर असतील, माजी शिक्षक गोकरणेकर सर असतील शाळेचे कर्मचारी असतील सर्वांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या या बॅच च्या सर्वच उपस्थित विद्यार्थ्यानी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेतील सर्व शिक्षकांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या. मात्र ज्या सरांचा मार्गदर्शनासाठी विद्यार्थी भुकेलेले असतात त्या देसाई सरांनी “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती” या पेक्षा आज या चिमण्यांनो परत फिरारे म्हणतो असे बोलत मुलांच्या डोळ्यात अश्रु आणलेत.
२२ वर्षापूर्वी दिलेली शिकवण आजही मूल विसरली नाही अस म्हणत आज माझी मुल फक्त वयाने नाही विचाराने आणि कर्तुत्वाने मोठी झाली , विविध क्षेत्रात नाव कमावतात अजुन एका गुरू ला हव ते काय आज माझ्या मुलांची हि संपत्ती पाहून आपण ही जगातील श्रीमंत माणूस झालो.तुमच्याकडून ही आम्ही अनेक गोष्टी शिकलो आणि आजही शिकतो म्हणत जीवन कस जगाव आदर्श कुणाचा घ्यावा आणि जीवनात अजुन कस पुढं जाता येईल याचाही धडा पुन्हा एकदा सरांनी मुलांना शिकवला आणि आज ३७, ३८वर्षाच्या लहान झालेल्या विद्यार्थ्यानी बँच वर शांत पणे ऐकुन घेत भावी जीवनात त्याचा उपयोग करण्याचा संकल्प केला.जाता जाता मुलांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि पुनः एकदा या मुलांनी हा परीसर डोळ्यात साठवत पण दरवर्षी आपण भेटायचं अस वचन घेतलं.आणि शाळेसाठी काहीतरी करायचं अशा भावना व्यक्त करत सरांच्या पायाशी नत मस्तक होत एकमेकांचा निरोप घेतला.
शेवटी कार्यक्रमाची सांगता करताना मंदार केळकर यांनी मनोगत व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.











