भालचंद्र महाराज संस्थानात महाशिवरात्र उत्सव

कणकवली : शहरातील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात बुधवार, २६ फेब्रुवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० वा. काकड आरती, समाधीपूजन, सकाळी ११ वा. समाधीस्थानी लघुरुद्र व आरती, दुपारी १ वा. खिचडी प्रसाद, दुपारच्या सत्रात भजने, सायंकाळी ५ वा. परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर आरती होईल. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे.