एका अपघाताच्या निमित्ताने…!

एका अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू’ ही मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या एका अपघाती घटनेची न्यूज आहे. खरंतर महामार्गावरील होणारे अपघात आणि वाहनचालकांचे पलायन हे काही नवीन नाही. जर वाहन पळवण शक्य असेल तर अनेकवेळा वाहनचालक अपघातस्थळी थांबतच नाही.

अर्थात याची पहिली बाजू जर अपघात झालेल्या पादचाऱ्याला मदत करण्यासाठी वाहन चालक थांबलाच तर अपघाताला कारण कोण ? चूक कोणाची आहे याची कोणतीही शहानिशा न करता वाहन चालकाला मारहाण करायची त्याचा आनंद घेणारे समाजकार्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्यांची संख्या या समाजात काही कमी नाही. खरंतर अपघात घडल्यानंतर ज्याचा अपघात झाला आहे त्या अपघातग्रस्त व्यक्तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याला प्राधान्यक्रम असला पाहिजे. परंतु तसं फार कमी वेळा घडते. यामुळे बहुतांश वेळा अपघात घडल्यावर वाहनचालक पळणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.

वाहनचालक लोकांचा मार खाण्यापेक्षा वाहन घेऊन पळ काढतात. अपघात झाल्यावर अपघातग्रस्ताला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पाहिजे. परंतु तसं फार कमी वेळा घडते. अपघातांच्या बाबतीत दोन्ही बाजू आहेत. परंतु अधिकवेळा वेगात गाडी चालवल्याने अपघात झाल्याचे आपणाला दिसून येते.महामार्गावर होणारे अपघात हे अतिवेगाने वाहन चालविण्याने होत आहे. दुचाकी चालकांचे अपघात हे वाहनचालक अती वेगात गाड्या चालविणार्या वाहनचालकांवर नियंत्रण किंवा त्यांना विचारणाणाच होत नाही.यामुळेच दुचाकीस्वरांकडून बेफीकीरीने वाहन चालवतात.चार दिवसापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली येथे झालेला अपघात हा देखिल भरधाव वेगाने कार चालविल्याने अपघात झाला आहे. या अपघातात जानवली येथील अनिल कृष्णा कदम या गरीब मोलमजूरी करणाऱ्या व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार १७ मे रोजी सकाळी ७ वा. हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तत्काळ कणकवली पोलिस स्टेशनला या अपघाताची माहिती देण्यात आली. या अपघाताच्या घटनेनंतर ज्या वाहनचालकाने अपघात करून वाहन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. ते वाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत अडविलं जाणं अपेक्षित होतं. यापूर्वी अपघात घडल्यानंतर वाहन अडविणे अपघाती वाहनाचा शोध घेणे असं घडलच नाही असे मी मुळीच म्हणणार नाही. असं अनेकवेळा घडलय पोलिसांनी रेकॉर्डप्रमाणे वाहनचालकावर ऑन रेकॉर्ड अपघातास कारण ठरल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

परंतु १७ मे च्या जानवली अपघातात असं काहीच घडल नाही. गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अपघातग्रस्त कार अडवली जायला हवी होती. परंतु कणकवली पोलिसांनी अपघात झाल्याची व कार घेऊन कार चालक पळून गेल्याची माहिती कुणाला दिली की नाही या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. खरंतर मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गात जागो-जागी महामार्ग वाहतुक पोलिस आणि जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस तपासणीच्या नावाखाली पर्यटक वाहनचालकांना कसे छळतात हे दृश्य अनेकदा दिसत. वाहतुक पोलिस ‘छळतात’ हा शब्दही मी जाणीवपूर्वक वापरला आहे. कोकणात नव्हे सिंधुदुर्गात येणारा पर्यटक कंटाळतो. अगदी सिंधुदुर्गात पर्यटन नको पण वाहतुक पोलिसांची तपासणी आवरा असं म्हणण्याची वेळ जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांवर आलेली असते. पूर्वी प्रमाणेच महामार्गावरचा हा तपासणीच्या नावाखाली ‘छळवाद’ सुरूच असतो. यात सांगायच एवढच आहे. महामार्गावर वाहतुक पोलिस असतानाही ही अपघात घडविणारी गाडी जाऊच कशी शकते ? गोव्यात गाडी गेली असेल तर बांदा चेक नाक्यावर गाड्यांची तपासणी केलीच जात नाही का ? अपघात जानवलीत झाला. वाहन गोव्याच्या दिशेने गेल्याची चर्चा असताना वैभववाडी, करूळ चेकनाक्यावर गाड्या चेकिंग करण्यात कोणतच कारण नव्हत. या अपघातात जो मृत्यू पावला तो एक सर्वसामान्य मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती होता. त्यांच्या मरणाने कदम कुटुंबाचा आधारवडच गेला आहे. पळून गेलेला कारचालक शोधून काढणे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. अज्ञात वाहनांचा शोध लागलाच पाहिजे. अन्यथा अपघात करून पळून जाता येते. कोणी काही करत नाही. काही फरक पडत नाही. ही प्रवृत्ती वाढेल. काळ सोकावू देता कामा नये.