सिंधुदुर्ग विमानतळावर आज राबविण्यात आले ‘मॉक ड्रिल’

सुरक्षिततेच्या बाबतीत जागरुकता व सतर्कतेसाठी उपाययोजना

परुळे : शंकर घोगळे

सुरक्षिततेच्या बाबतीत जागरुकता व सतर्कता कशी बाळगावी या बाबतीतील मॉक ड्रिल’ चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर आज राबविण्यात आले.

एखाद्या वेळी आपतकालीन परिस्थितीत विमानतळावर गंभीर परिस्थीती निर्माण झाली तर त्याला कशा प्रकारे तोंड देता यावे या बाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय करायचे याचि माहिती होण्यासाठी त्याचे ही प्रात्याक्षिक सिंधुदुर्ग विमानतळावर व परिसरात करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र औधोगीक विकास मंडळ कुडाळ, अग्नी शमन दल, प्राथमिक आरोग्य केंद्र परुळे ची रुग्णवाहिका आणि रुग्णसेविका तसेच सिंधुदर्ग विमानतळ प्रशासन यांनी यात सहभाग घेतला.

यावेळी एखादा अपघात झाला तर किवा आग लागण्याची घटना घडली तर कोणत्या प्रकारची सावधगिरी बाळगावी यांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यावेळी विमानतळ व्यवस्थापक किरण कुमार, कुलदीप सिंग, रितेश शेट्टी, ब्रेक्स इंडीया चे हेमंत फडतरे, अनिल यादव यासह प्लाय 91 चे अधिकारी व कर्मचारी यानी सहभाग घेतला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारीवर्ग आणि निवती पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते.