राजापूर तालुक्याची धवल यशाची परंपरा कायम

बारावी परिक्षेचा निकाल 98.11 टक्के

10 कनिष्ठ महाविद्यालयांचा 100 % निकाल

राजापूर (वार्ताहर): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे वतीने घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राजापूर तालुक्याने आपल्या धवल यशाची परंपरा कायम राखली आहे. या परिक्षेचा राजापूर तालुक्याचा एकुण निकाल 98.11 टक्के लागला आहे.
यामध्ये दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. राजापूर तालुक्यातील आयटीआयसह 18 कनिष्ठ महाविद्यालयातून या परिक्षेसाठी 1381 विद्यार्थी बसले होते. पैकी 1355 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
त्यामध्ये 95 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. तर 382 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 691 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 187 विद्यार्थी पास श्रेणीत उतीर्ण झाले आहेत.

 

यामध्ये राजापूर हायस्कुल व गोडे दाते कनिष्ठ महाविद्यालय राजापूरचा निकाल 96.68 टक्के, सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल 99.61 टक्के, न्यु इंग्लिश स्कुल व एस. आर. मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर 95 टक्के, आदर्श विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वाटूळ 97.14 टक्के, वि. सी. गुर्जर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कशेळी 100 टक्के, नूतन विद्यामंदिर व क. महाविद्यालय ओणी 92.85 टक्के, नवजीवन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर 99.61 टक्के, श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरेचा निकाल 95.91 टक्के, ज्ञानप्र्रबोधिनी दत्तवाडी क. महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के, साने गुरूजी विद्यामंदिर व पी. बी. चव्हाण क. महाविद्यालय जानशीचा निकाल 100 टक्के, नाटेश्वर विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय नाटे 100 टक्के, इंद्रनिल तावडे कनिष्ठ महाविद्यालय कोंडये 100 टक्के, माध्यमिक विद्यालय मूर 100 टक्के, बा. ल. साठे माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय देवाचेगोठणे 100 टक्के, सागवे कनिष्ठ महाविद्यालय 96 टक्के, नॅशनल इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर 100 टक्के, शासकीय तंत्रनिकेतन हर्डी 100 टक्के, रा. ब. उमाकांत श्रीरंग देसाई विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कुंभवडेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
या परिक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, शिक्षकवृंदाचे अभिनंदन होत आहे.