प्रशालेची रिद्धी तळगावकर तालुक्यात तिसरी
बांदा (प्रतिनिधी) : धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रशालेत अकाऊंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट शाखेची रिध्दी महेश तळगांवकर हीने ९१.८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. आकांक्षा गोविंद सावंत ९०.३३ गुण मिळवून द्वितीय व नेहा नरेश ठाकूर ९०.१७ गुण मिळवीत तृतीय आली. बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ३४९ प्रविष्ठ झाले होते. प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे – (विज्ञान शाखा) – प्रथम प्रणव गणपत नाईक (९०), द्वितीय संकेत प्रेमानंद देसाई (८५), तृतीय ईशा अजय महाजन (८३.३३). (वाणिज्य शाखा) – प्रथम सानिया शामसुंदर मयेकर (८१), द्वितीय तनय संजय केसरकर (७८.५०), तृतीय दिपराज दुलाजी सावंत (७६.५०).
(कला शाखा) – प्रथम जान्हवी सुनील ठाकूर (८८), द्वितीय कमल शाणू वडार (८७), तृतीय संकल्प चंद्रकांत गवस (८५.१७). (अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट) – प्रथम रिद्धी महेश तळगावकर (९१.८३), द्वितीय आकांक्षा गोविंद सावंत (९०.३३), तृतीय नेहा नरेश ठाकूर (९०.१७).
( इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी) – प्रथम मनोहर विष्णू गावडे (७६.१७), द्वितीय गौरेश विजय वालावलकर (७४.६७), तृतीय पार्थ दत्ताराम चव्हाण (७४.१७). (हॉर्टिकल्चर) – प्रथम नयन रामदास डिंगणेकर (५४.१७).
प्रशालेच्या विज्ञान शाखेतून (१०७), कला (८७), वाणिज्य (७७) आणि व्यावसायिक शाखेतून ३९ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. सर्व शाखांचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ मिलिंद तोरसकर, संस्था कार्यकारिणी, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.












