राज्यात पुन्हा एकदा कोकण पॅटर्न यशस्वी करणार्‍या विद्यार्थ्यांचे अभिनंदन : विशाल परब

सावंतवाडी । प्रतिनिधी : बारावीच्या निकालात राज्यात परत एकदा कोकण पॅटर्न यशस्वी ठरला असून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनीही बाजी मारली आहे. या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे मी मनापासून त्यांचे विशेष अभिनंदन करतो. अशाच पद्धतीने कोकणचा मान आमच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाढवत राहावा, अशा शुभेच्छा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिल्या.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विशाल परब यांनी अभिनंदन केले.