परुळे हायस्कूल मद्ये दहावीत तृतीय आलेल्या कु शाल्मली शंकर घोगळे हिचा भाजप तर्फे सन्मान..

परुळे | प्रतिनिधी:
दैनिक प्रहार चे पत्रकार तथा परुळेबाजार ग्रामपंचायत चे लिपिक शंकर घोगळे यांची सुकन्या कु शाल्मली शंकर घोगळे हिने माध्यमिक शालांत परिक्षेत अण्णासाहेब देसाई विद्यामंदीर परुळे प्रशालेत ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला याबद्दल भाजपा परुळे विभागातर्फे तिचा आज शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सभापती निलेश सामंत, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुदवडकर, माजी सरपंच प्रदिप प्रभु, प्राजका चिपकर, शक्तीकेंद्र प्रमुख सुनील चव्हाण, रक्षिता गोवेकर, शंकर घोगळे यांसह सी.आर.पी उपस्थित होते.