*देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती* या समुहातील विविध क्षेत्रात समाजहितैषी वृत्तीने झोकून देउन काम करणाऱ्या महाराष्ट्रतील सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींचे स्नेहसंमेलन दि. ३० मे व ३१ मे रोजी देवरुख , ता. संगमेश्वर , रत्नागिरी येथे संपन्न झाले. कार्यक्रमाचे संयोजक श्री महादेव रानडे ,अध्यक्ष सुविद्या प्रसारक संघ , बोरिवली व निमंत्रक श्री सदानंद भागवत ,अध्यक्ष, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
दोन दिवस चाललेल्या ह्या संमेलनात सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या कार्याची माहिती सांगितली. ह्या समुहातर्फे देखणी ती पाऊले … ह्या सदराखाली आत्तापर्यंत ८ भागाची लेख मालिका ( ७२ लेख ) पुस्तिका श्री महादेव रानडे सरांनी प्रसीद्ध केली आहे. या कार्यक्रमात पुढील कामाची दिशा व पुढील संमेलनाचे नियोजन याविषयी चर्चा झाली व महाराष्ट्रतील या व अशा अनेक मंडळींना एकत्र आणून त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन देखील करण्यात आले.श्री सदानंद भागवत सरांनी देवरुख येथील त्यांच्या नवीन सृजन सायन्स अँड इनोव्ह्येशन ऍक्टिव्हिटी सेंटर व इतर सर्व शिक्षण संस्थानची भेट आयोजित करुन माहिती दिली.
स्नेह संमेलनामधून आम्ही सर्वजन एकमेकांच्या अधिक जवळ आलो आहोत आणि एकमेकांना ऊर्जा देण्याचे काम केले आहे. प्रत्येकाचे उद्दिष्ट समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे आहे. या भावनेतून प्रत्येक जण आपल्या परीने हे व्रत म्हणून करतच आहे. एकमेकांचा हात हातात घेऊन आपण ते काम केले तर आपापले काम आणखी ताकदीने करू शकू असा विश्वास निर्माण झाला.खरेतर एकमेकांची व्यक्तिशः ओळख होण्याबरोबरच आपापल्या कामाचीही ओळख व्हावी आणि आपल्या समूहामधील प्रत्येकाचे काम हे आपल्या सर्वांचेच काम आहे ही भावना सर्वांनी मनामध्ये रुजविणे हा देखिल एक प्रमुख उद्देश या संमेलनाचा होता. एकसंघ पणाची भावना रुजविण्यामध्ये या संमेलनात नक्कीच यशस्वी झालो आहोत.










