वायरी येथे ना. नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष

वायरी येथे ना. नारायण राणे यांच्या विजयाचा जल्लोष

मालवण | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे विजयी होताच मालवणात सर्वच ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजीसह जल्लोष सूरू आहे. वायरी भागात भाजपा शक्ती केंद्र प्रमुख केदार झाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष केला.

कोकणच्या विकासासाठी राणे साहेब यांचा विजय महत्वाचा होता. जनतेच्या साथीने हा विजय निश्चित झाला. मालवण कुडाळ मतदारसंघात भाजप नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात मोठे मताधिक्य मिळाले. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या मेहनतीचा व जनतेच्या पाठिंब्याचा हा विजय असल्याचे केदार झाड यांनी या निमित्ताने सांगितले.

यावेळी केदार झाड यांसह देवानंद लोकेगांवकर, शाम झाड, संदीप बोडवे, सुदेश परकर, समीर गोवेकर, आनंद हडकर, मुकेश आचरेकर, विशाल वेंगुर्लेकर, विकी लोकेगांवकर, गणेश सातार्डेकर, संदेश ताळगावकर, मंदार गोवेकर, बबन गावकर, दादू डिचवलकर, माडये, कृष्णा देवूलकर व अन्य सहकारी उपस्थित होते.

फोटो : वायरी येथे भाजपा शक्ती केंद्र प्रमुख केदार झाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष केला. (अमित खोत, मालवण)