खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गा वरील भरणे जाधववाडी नजीक बिबट्या वाघाची नखे विक्रीसाठी घेऊन आलेल्या ३ संशयितांना चिपळूण वनविभागाकडून मुद्देमालासह ५ जून रोजी ताब्यात घेतले. तर गुरुवारी केलेल्या कारवाईत एकाला बिबट्या वाघाच्या नखासह ताब्यात घेण्यात आले
५ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे भरणे ता. खेड गावचे हद्दीत मुंबई – गोवा महामार्गावर स्थानिक ठिकाण जाधववाडी या ठिकाणी बिबटया या वन्यप्राण्याची नखे विक्रीसाठी अज्ञात इसम रिक्षामधून येणार असलेची माहिती मिळाली होती. या ठिकाणी सापळा रचून तीन संशयित दिलीप सावळेराम कडलग व.व. ४८ रा. घाटकोपर, मुंबई अतुल विनोद दांडेकर व व. ३६ रा. चेंबुर, मुंबई , विनोद पांडुरंग कदम व.व. ४२ रा. सावर्डे ता. चिपळूण त्यांचे ताब्यातील रिक्षा क्र.एम एच ०३ बी ए ९७१२ मधून संशयितरित्या फिरत असलेचे निदर्शनास आलेने त्याची अंग झडती घेतली असता, त्यांच्या कडून कडून बिबटया या वन्यप्राण्याची एकूण ४ नखे व रिक्षा हस्तगत करणेत आली.
या प्रकरणी ३ जणांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ सुधारणा २०२२ कलम ९, ३९, ४८अ, ४९, ५१, ५२ व ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
साखरपा मध्ये ही कारवाई एक जण ताब्यात
दरम्यान गुरुवारी संशयित अतुल विनोद दांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार साखरपा ता. संगमेश्वर येथे सापळा रचून सचिन रमेश गुरव रा. गोविळ ता. लांजा जि. रत्नागिरी या इसमास बिबटया वाघाची या वन्यप्राण्याच्या एकूण ०४ नखे, हिरो कंपनीची दुचाकी सह ताब्यात घेणेत आले.असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कार्यवाही श्री. आर. एम. रामानुजम, मुख्य वनसंरक्षक (प्रा), कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती. गिरीजा देसाई, विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण), श्री. वैभव बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली, श्री. प्रकाश सुतार, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी, श्री. सुरेश उपरे, वनपाल खेड, श्री. साताप्पा सावंत, वनपाल दापोली, श्री. रामदास खोत, वनपाल फिरते पथक रत्नागिरी (चिपळूण), श्री. तौफिक मुल्ला, वनपाल संगमेश्वर (देवरूख), वनरक्षक श्री. अशोक ढाकणे, श्री. परमेश्वर डोईफोडे, श्रीम. प्रियांका कदम, श्रीम. शुभांगी भिलारे, श्री. गणपत जलणे, श्री. विराज संसारे, श्री. सिध्देश्वर गायकवाड, श्री. विशाल पाटील, श्री. आकाश कडुकर, श्री. सुरज तेली, श्री. अरूण माळी, श्री. प्रभू साबणे, श्री. रणजित पाटील, श्रीम. श्रावणी पवार, श्रीम. नमिता कांबळे, श्रीम. प्रतिक्षा नवले यांनी पार पाडली. पुढील तपास श्री. प्रकाश पाटील, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली हे करीत आहेत.










