भाजप नेते आ. नितेश राणे यांची उपस्थिती
सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीतील श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येणार आहे. राजवाडा येथील श्री देव पाटेकर देवस्थानाकडे सकाळी ११ वाजता प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा बँकेचे संचालक व पॅनल प्रमुख महेश सारंग, भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित राहणार आहेत.
तरी यावेळी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी यांनी केले आहे.
Sindhudurg