‘त्या’ चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Arrested man in handcuffs, crime scene. Close-up, selective focus.

खेड(प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे-जाधववाडी येथे बिबट्याच्या नखे तस्करी प्रकरणी वनविभागाच्या पथकाने जेरबंद केलेल्या ‘त्या’ चौघांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. चौघांनाही प्रत्येक गुरूवारी दापोली परीक्षेत्र वनाधिकारी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असल्याचे समजते.

चिपळूण वनविभागाच्या पथकाने दिलीप सावळेराम कडलग (घाटकोपर-मुंबई), अतुल विनोद दांडेकर (चेंबूर-मुंबई), विनोद पांडुरंग कदम (सावर्डे-चिपळूण), सचिन रमेश गुरव (गोविळ-लांजा) यांच्या मुसक्या आवळत बिबट्या नखे तस्करी प्रकरणाचा छडा लावला.