उधना-मंगळूर स्पेशल धावली ५ तास लेट

 

खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे विस्कळीत वेळापत्रक काही अंशी पूर्वपदावर आलेले असतानाच गुरुवारी उधना मंगळूर स्पेशल तब्बल ५ तास लेट धावली तर अन्य ९

रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली.उधना मंगळूर स्पेशल विलंबाने धावण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

सावंतवाडी- दिवा पॅसेंजर, सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी
एक्सप्रेस, निजामुद्दीन एक्सप्रेस १ तास विलंबाने धावल्या. पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस २ तास ३५ मिनिटे, एलटीटी- करमाळी वातानुकूलित स्पेशल २ तास ३० मिनिटे तर
सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २ तास १० मिनिटे उशिराने रवाना झाल्या.