मालवण व्यापारी संघाची १६ रोजी वार्षिक सभा

मालवण : (प्रतिनिधी)

मालवण व्यापारी संघाच्या सर्व सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दैवज्ञ भवन याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पर्यटकाला वाचविणाऱ्या शहरातील मुलांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी व्यापारी सभासदांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांनी केले आहे.