नवलादेवीवाडी तरुण मित्र मंडळाचे आयोजन
वैभववाडी | प्रतिनिधी :
तरूण मित्र मंडळ नाधवडे नवलादेवीवाडी यांच्यावतीने नाधवडे ब्राह्मणदेववाडी नवलादेवीवाडी शाळेमध्ये मोफत वह्या, शालेपयोगी वस्तू वाटप व ग्रामस्थांना काजूचे झाड भेट देऊन वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आला तरुण मित्र मंडळ नाधावडे नवलादेवीवाडीच्या वतीने गेली 40 वर्ष मोफत वह्या वाटप व शालेयपयोगी वस्तू वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळ मार्फत केला जातो. या शाळेचे माजी विद्यार्थी तरुण मित्र मंडळाचे सदस्य मुंबई व स्थानिक गेली 40 वर्ष वह्या वाटप व गुणवंतांचा सत्कार दरवर्षी करतात. यावर्षी प्रत्येक ग्रामस्थाला काजूचे झाड भेटवस्तू देऊन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन शेतकऱ्यांच्या बागेमध्ये एक काजू झाड जोपासले जावे अशा प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रम मंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बंड, माजी सभापती बाप्पीसाहेब मांजरेकर, जिल्हा नियोजन सदस्य सुधिर नकाशे, मंडळाचे सल्लागार विठ्ठल बंड, राघो पेडणेकर, सरपंच शैलजा पांचाळ, उपसरपंच श्रीरंग पावसकर, बाबा कोकाटे, गोपाळ कोकाटे, लीना पांचाळ, माजी सभापती बंड्या मांजरेकर, परशुराम ईस्वलकर, मुख्याध्यापक संजय पाताडे, नारकर सर, संतोष पेडणेकर, बाबू तावडे, महेश बंड, संदीप पेडणेकर, कृष्णकांत मांजरेकर, प्रमोद खांडेकर, नागेश पेडणेकर, दशरथ पेडणेकर, सतीश बेळणेकर, सुमित ताम्हणकर, ओमकार खांडेकर, महेश पेडणेकर, समीर बंड, गणेश बंड, संजय नकाशे, संजय पेडणेकर, दशरथ बेळणेकर, प्रसन्न पेडणेकर, रमाकांत आडीवरेकर, नाना बंड, रामचंद्र खांडेकर, शंकर खांडेकर, प्रकाश बंड, शशिकांत पेडणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.












