

निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ तवसाळ तांबडवाडी आयोजित भव्य शालेय बॅग वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न….!!!
गेली सात ते आठ वर्ष आमच्या जि.प.आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी शाळेसाठी वह्या वाटप कार्यक्रम दरवर्षी असतोच. दोन वर्षापासून आम्ही जि.प.आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी आणि जि.प. शाळा तवसाळ बाबरवाडी या दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग देऊ शकलो याचा आम्हाला जास्त आनंद. तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी चांगले मार्गदर्शन केले. तुम्ही निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ (तांबडवाडी) जे काही शालेय उपक्रम तुम्ही राबवता आहात ते खूपच कौतुकास्पद आहे.असेच उपक्रम प्रत्येक गावागावात वाडी वाडीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये झालेच पाहिजे.आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा चालू राहिल्या पाहिजेत. आता सध्याच्या परिस्थितीत गावाकडील शाळा ह्या ओस पडू लागल्या आहेत.
असेच या कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे मा.श्री.परवेझ चिपळूणकर सर (केंद्रप्रमुख) मा.श्री.नंदकुमार बेंद्रे साहेब, मा.सौ.प्रियांका सुर्वे मॅडम (सरपंच), मा.श्री.विजय मोहिते साहेब (शिक्षण समिती माजी अध्यक्ष), मा.श्री.निलेश सुर्वे साहेब, मा.श्री.शितप साहेब, मा.श्री.निलेश खामकर सर, मा.श्री.सुनील लाकडे सर, मा.श्री.जोगळेकर सर (मा. ल.भा. हेदवकर हेदवी हायस्कूल मुख्याध्यापक), मा.श्री.कोकाटे सर, मा.श्री.दत्ताराम जोगळे साहेब (समाजसेवक) मा.श्री. चंद्रकांत निवाते साहेब, मा.श्री.रमेश कुरटे साहेब(शिक्षण समिती अध्यक्ष), मा. सौ.निवाते मॅडम, मा.सौ.येद्रे मॅडम, मा.सौ.नम्रता निवाते(माजी सरपंच) मा.श्री.कृष्णा वाघे साहेब, मा.श्री.संदीप जोशी साहेब (माजी सरपंच) मा.श्री.शंकर येद्रे साहेब, मा.श्री.विजय नाचरे साहेब, मा.श्री.दीपक निवाते साहेब मा.श्री.अंकुर मोहिते सर (मुख्याध्यापक तवसाळ तांबडवाडी) तसेच वाडीतील सगळेच ग्रामस्थ आणि महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य आणि आर्थिक मदत केली त्या सर्वच देणगीदार यांचे आम्ही निर्मला इलेव्हन क्रिकेट संघ (तवसाळ तांबडवाडी) सदैव ऋणी आहोत. !!!!!












