गुहागर Breaking : आबलोलीचे प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांचा राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान

Google search engine
Google search engine

Guhagar Breaking : Sachin Karekar, an experimental farmer of Abloli, honored by President Draupadi Murmu.

गुहागर | प्रतिनिधी : गेली २० वर्षे राबून आणि सातत्य राखून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांना त्यांनी संशोधीत केलेल्या SK-4 (स्पेशल कोकण -४) या वाणांबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवन येथे विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. कृषी क्षेत्रातीली उल्लेखनीय कामाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा यथोचित सन्मान केला. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या सहाय्याने शेतीमध्ये विविध प्रयोग करताना SK-4 (स्पेशल कोकण -४) या हळदीच्या वाणाला चांगला प्रतिसाद सुधा मिळत आहे.
नवोपक्रम आणि उद्योजकतेचा उत्सव या उपक्रमांतर्गत सचिन कारेकर यांच्या कृषी क्षेत्रातीली संशोधनाबद्दल त्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. सर्वत्र त्यांचा अभिनंदन होत आहे.