खेड लायन्सतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

खेड (प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटी यांच्या वतीने तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील २५३ विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

भरणे येथील मोरे फर्निचरचे मालक संदिप मोरे यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबवण्यात आला. याचवेळी भरणे अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांनाही खेळणी वाटप करण्यात आली. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे, सचिव सुरेश चिकणे, संदिप मोरे, पप्पू शेठ, महेंद्र शिरगावकर, मुख्याध्यापिका शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शिक्षक उपस्थित होते.