मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव तिठा येथील घटना

नांदगाव | वार्ताहर : मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव तिठा येथील असलदे पियाळी नदी पूलावरील दुभाजकातील संरक्षक कठड्याला चार चाकी कारची जोरदार धडक बसली या अपघातात सिंधुदुर्ग महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार श्री. यशवंत उर्फ अभी भास्कर तांबे जागीच ठार झाले तर एक जण जखमी झाला. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातानतंर गाडीच्या पूढील भागाचा चुराडा झाला. ही घटना शनिवारी पहाटे ३:१५ च्या सुमारास घडला.
मुंबई गोवा महामार्गावरून वैभववाडीच्या दिशेने आपल्या ताब्यातील कार घेऊन जाणारे सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस हवालदार जाणारे श्री. यशवंत भास्कर तांबे, वय ३५, रा. वैभववाडी व आणखी दोघेजण जात असताना नांदगाव नजीक असणा-या असलदे पियाळी नदीच्या पूलावर आले असता मध्यभागी असणा-या दुभाजकाच्या संरक्षक कठड्यावर कार आदळत अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पूढील भागाचा चक्काचूर होत एअर बॅग खुल्या झाल्या.
या भीषण अपघातात श्री यशवंत उर्फ अभी तांबे जाणीच ठार झाले तर इतर दोघांमधील एक जण जखमी असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहीती मिळताच सिंधुदुर्ग वाहतूक पोलीस, कणकवली पोलीस व स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानतंर काहीकाळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर नेमका अपघात कसा झाला याची माहिती मिळू शकली नसून अधिक तपास पोलीस करीत आहेत. वैभववाडीसह,जिल्हात मोठा मित्रपरिवार असणारा नेहमी हसतमुख व्यक्तिमत्व क्रिकेटपटू श्री. यशवंत उर्फ अभी तांबे याच्या अकाली अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.










