दापोलीत चोरट्याने सोन्याचे दुकान फोडले, हजारोंचा मुद्देमाल लंपास
दापोली | प्रतिनिधी :-दापोलीत चोरट्याने शुभम ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान सोमवारी रात्री फोडले. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरू असून चोरटयापर्यंत लवकरच पोहोचू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दापोलीत चोऱ्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील वेळवी येथे गेल्या आठवड्यात चोरट्याने तीन दुकाने फोडून मुद्देमालासह रोकड लंपास केले होते. अशातच दापोली शहरातील भर मार्केटमध्ये चोरट्याने ज्वेलर्स दुकान फोडल्याने खळबळ उडाली आहे.
दापोली शहरातील मच्छी मार्केट येथील शुभम ज्वेलर्स चोरट्याने फोडले. ज्वेलर्स मधील सोन्या चांदीचे दागिने लंपास झाले आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे ओमिनी गाडीतून आल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. त्यामुळे दापोली पोलीस या चोरट्यांचा तपास करत आहे.












