खेड(प्रतिनिधी) पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी अंबवली संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबवली या विद्यालयात वृक्षारोपण व परसबाग लागवड करण्यात आली यात प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला.
या वृक्षारोपण व परसबाग लागवडीच्या निमित्ताने प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. यादव मॅडम त्याचबरोबर श्री शिर्के सर, श्री आव्हाड सर श्री मानके सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री सुरेश कदम तसेच अजित यादव व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यानी आपल्या परिसरातील विविध रोपे लावण्या साठी आणली होती. यामध्ये वड,पिंपळ, जांभूळ, आंबा, काजू या स्थानिक वृक्षांचा समावेश होता त्याच बरोबर मोठ्या संख्येने फुलझाडे देखील सुशोभीकरणासाठी लागवड करण्यात आली. परसबाग निर्मितीमध्ये प्रामुख्याने वांगी, मिरची, पालेभाज्या, शेंग भाज्या, फळभाज्या यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.









