रणजित परब हे कांदळगावच्या इतिहासातील अकार्यक्षम सरपंच

 

शाळा दुरुस्तीसाठी कितीवेळा पत्रव्यवहार केला हे जाहीर करा नाहीतर राजीनामा द्या : ग्रापं सदस्य विहार कोदे यांची बोचरी टीका

मालवण | प्रतिनिधी : कांदळगाव जिल्हा परिषद शाळा नंबर-२ या शाळेच छप्पर दुर्घटनेवरून निलेश राणे यांनी केलेल्या मदतीनंतर टीका करणारे रणजित परब हे कांदळगावच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम सरपंच आहेत. मुळात हे सरपंच नसून आमदार वैभव नाईक यांचे दलाल आहेत, ज्यांना फक्त टक्केवारीची भाषा समजते. अशी टीका ग्रापं सदस्य विहार कोदे यांनी केली आहे.

 

 

सरपंच रणजित परब यांनी आपल्या कार्यकाळात एकही विकासकाम आणलं नसून केंद्र शासनाकडून मिळालेला १५ व्या वित्तआयोगाचा निधीही सरपंच रणजित परब यांना खर्च करता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आलेल्या जलजीवन मिशन योजना देखील कांदळगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यान्वित झाली नाही. याला सरपंच रणजित परब हेच जबाबदार आहेत. सरपंच रणजित परब यांनी निलेश राणे यांच्या जनहिताच्या कामावर टीका करण्याअगोदर शाळा दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी किती पाठपुरावा केला त्याचा पाठपुरावा जाहीर करावा. नाहीतर कांदळगाव छप्पर दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या सरपंचपदाचा राजीनामा द्यावा. अशी कांदळगाव ग्रामपंचायत सदस्य विहार कोदे यांनी केली आहे.