मजुरीच्या कामाला येणार नसल्याच्या कारणातून एकास मारहाण

crime marhan

खेड(प्रतिनिधी)मजुरीच्या कामाला येणार नसल्याच्या कारणातून एका ५४ वर्षीय प्रौढास  लाकडी बांबूने मारहाण करून त्यास जखमी करणाऱ्या एकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना २७ रोजी वेरळ, सायली
अपार्टमेंट,येथे घडली

पांडुरंग पवार पुर्ण नाव माहीत वय – ५४ वर्षे रा. वेरळ सायली अपार्टमेंट, पहिला मजला, शिक्षक कॉलनी ता. खेड असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे तर गोविंद रामु नलावडे वय – ५४ वर्षे, रा-वेरळ प्रभुवाडी ता. खेड असे मारहाण झालेल्या प्रौढाचे नाव आहे या प्रकरणी नलावडे यांनी तक्रार दाखल केली आहे

नलावडे हे   कामाला येणार नाहीत या गोष्टीचा राग मनात धरुन, फिर्यादीला त्याच्या घरी बोलावुन घेवुन   त्याच्या घराचा दरवाजा उघडुन हातातील बांबुच्या काठीने फिर्यादीच्या डोक्यामध्ये मारुन फिर्यादीच्या डोक्याला दुखापत केली