सहाय्यक आयुक्त वस्तू-सेवा कर पदावर मोरे यांना पदोन्नती

 
खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील निगडे गावचे सुपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या संतोष मोरे यांची
पुणे येथे सहाय्यक आयुक्त वस्तू व सेवा कर पदावर पदोन्नती झाली आहे.
लिपिक पदापासून कार्यरत असलेल्या मोरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना बढती देण्यात आली आहे. कोकणवासिय मराठा समाज पुणे व पिंपरी चिंचवडचे ते अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.