साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटातील विसावा स्पॉट जवळीलच्या दरीत सुमारे ५० वर्षाच्या पुरुष व्यक्तीचा मृतदेह सापडला.
सध्या पाऊस सुरु असून अनेक पर्यटक आंबा घाटात येत असून पर्यटकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नसून फोटो काढत असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराड जवळील दरीत मृतदेह दिसला .त्यांनी पोलिसांना याची कल्पना दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी करून सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून सायंकाळी साडेचार वाजता साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलाअसून वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी साखरपा आरोग्य केंद्रात येऊन पाहणी केली असून पोलीस कार्यवाही सुरु आहे.










