शहरातील घंटागाडी बुधवारी बंद

कुडाळ | प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कर्मचारी यांचे बुधवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याने कुडाळ शहरातील सर्व घंटा गाड्या दुपारी 12.वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. दुपारी बारानंतर सर्व प्रभागातील घंटागाड्या सुरू करण्यात येणार आहेत. तरी नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.असे आवाहन कुडाळ नगरपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.